सरोजनीनगरात नागरी सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:33+5:302021-08-25T04:25:33+5:30
रेणापूरनगर पंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ११ मधील सरोजनी राजेनगरमध्ये नागरी वस्ती आहे. मात्र, या नागरी वस्त्यांमध्ये अद्यापही रस्त्याचे काम ...

सरोजनीनगरात नागरी सुविधांचा अभाव
रेणापूरनगर पंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ११ मधील सरोजनी राजेनगरमध्ये नागरी वस्ती आहे. मात्र, या नागरी वस्त्यांमध्ये अद्यापही रस्त्याचे काम झालेले नसून, रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे, तसेच या भागात नाल्याची सोय नसल्याने जागोजागी पाणी साचून त्यात डासोत्पती होत असून, डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरोजनी राजेनगर येथील नागरिकांच्या अडचणी दूर करून तत्काळ या भागात रस्ते व त्या लगतच्या नाल्याचे काम तातडीने करावे, अन्यथा रेणापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष बालाजी कदम, चंद्रकांत गिरी, फिरोज शेख, इस्माईल कुरेशी, बिलाल बागवान, नयुम शिकलकर, शेराली शेख, मेघराज कातळे, शेख नवाब, सय्यद निजाम, बाबू शिकलकर, गोविंद पेशवे, सलीम शेख, शेख वाजिद, गोपाळ पेशवे, उद्धव भुजबळ, सुहास पाटील, अंगद शिंदे, सचिन तपघाले, दगडू कलशेट्टी, नागनाथ डावळे, रमाकांत कुराडे, सूरज फुलारी, लक्ष्मण मार्कंड, दत्ता आकनगिरे, धनंजय चव्हाण, बशीर शेख आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.