हेर येथे कोविड लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:23+5:302021-06-16T04:27:23+5:30
... मोटेगाव येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर रेणापूर : तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोटेगाव येथे कोविड ...

हेर येथे कोविड लसीकरण जनजागृती
...
मोटेगाव येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर
रेणापूर : तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोटेगाव येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी १५० जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविकांची उपस्थित होती. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येऊन प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
...
कानेगावात पशुधनासाठी लसीकरण मोहीम
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील कानेगाव येथे पशुधनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, सरपंच ब्रह्मानंद शिवनगे, उपसरपंच राम अटरगे, बालाजी राचुरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. डी.बी. शेल्हाळे, श्रीकृष्ण हंकारे, अंगद येरमुळे, अर्जुन सुरवसे, बबन गवारे, खंडू म्हेत्रे, संजय चाेपडे यांच्यासह पशुपालक उपस्थित होते.