शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर काेल्हापूरचे वर्चस्व

By संदीप शिंदे | Published: March 12, 2024 6:55 PM

पुणे, सातारा संघास उपविजेतेपद : स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

उदगीर : येथील तालुका क्रीडा संकुलात शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने पार पडलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ग्रीकोरोमन व महिला गटात विजेतेपद पटकाविले, तर फ्री स्टाइल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने विजेतेपद पटकावीत वर्चस्व राखले आहे, तर पुणे व सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले.

बक्षीस वितरण सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाले, तर क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, दिनेश गुंड, शिवाजी कोळी, तहसीलदार राम बोरगावकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, मनोज पुदाले, भगवान पाटील तळेगावकर, रामचंद्र तिरुके, ॲड. गुलाब पटवारी, मन्मथप्पा किडे, सुधीर भोसले, ॲड. दत्ताजी पाटील, धनाजी मुळे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अर्जुन आगलावे, संग्राम पाटील, दीपाली औटे, वर्षा मुस्कावाड, पोलिस निरीक्षक करण सोनकवडे, पो. नि. अरविंद पवार उपस्थित होते.

१७२ गुणांसह कोल्हापूरची विजेतेपदावर मोहोर...ग्रीकोरोमन प्रकारात कोल्हापूर जिल्हा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवीत १७२ गुणांसह विजेतेपदावर मोहोर उमटवली. पुणे जिल्हा संघाला ९० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर सांगलीच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फ्री-स्टाइल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने सर्वाधिक १३५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पुणे शहर संघाला १३० गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर जिल्हा संघ १२० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. महिला गटात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा संघाने ११५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सातारा संघाने १०५ गुणांसह दुसरा, तर सांगली संघाने १०५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३० हजार रुपयांच्या बक्षिसांनी गौरविण्यात आले.

सोनबाचा सोनेरी चौकार...कोल्हापूरच्या सोनबा गोंगाने याने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार ठोकण्याचा पराक्रम केला. यंदाच्या ६५ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सोनबाने नाशिक जिल्ह्याच्या शुभम मोरेला १०-० गुण फरकाने लोळवून आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखविले. शुभमला रौप्यपदक मिळाले. या गटात पुणे शहरचा अभिजित शेळके व कोल्हापूरचा प्रतीक साळोखे कांस्य पदकाचे मानकरी ठरले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. श्याम डावळे यांनी मानले.

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती