दुचाकी अपघातात किनगावचे दाेघे ठार; अंबाजाेगाई महामार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 22:40 IST2022-06-10T22:40:16+5:302022-06-10T22:40:24+5:30
दरम्यान, त्यांच्या दुचाकीचा अपघात अहमदपूर-अंबाजाेगाई महामार्गावर असलेल्या कांगणेवाडी- समतापूर परिसरात घडला.

दुचाकी अपघातात किनगावचे दाेघे ठार; अंबाजाेगाई महामार्गावरील घटना
अंधाेरी / किनगाव (जि. लातूर) : दुचाकी अपघातात किनगाव येथील दाेन तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कांगणेवाडी (ता. अंबाजाेगाई) परिसरात घडली.
पाेलिसांनी सांगितले, किनगाव (ता. अहमदपूर) येथील सूर्यकांत नरहरी गायकवाड (वय ४५) आणि महेताब उर्फ जावेद अल्लाबक्ष शेख (वय ३५) हे दाेघे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरुन प्रवास करत हाेते. दरम्यान, त्यांच्या दुचाकीचा अपघात अहमदपूर-अंबाजाेगाई महामार्गावर असलेल्या कांगणेवाडी- समतापूर परिसरात घडला. अपघाताचे कारण समजू शकले नाही. या अपघातामध्ये दुचाकीवरील दाेघेही ठार झाल्याची माहिती किनगाव पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक राजेश जाधव यांनी दिली.