शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न; फरार आराेपींच्या मुसक्या आवळल्या

By राजकुमार जोंधळे | Updated: June 9, 2023 19:28 IST

लातूर पाेलिसांची कारवाई : सापळा लावून दाेघांना पकडले...

लातूर : खंडणीच्या वसुलीसाठी एकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दाेघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लातुरातील औसा राेड परिसरात पाेलिसांनी सापळा लावत मुख्य आरोपी पंकज श्यामसुंदर पारिख, त्याचा साथीदार समीर राजासाब सय्यद यांना शुक्रवारी अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, पंकज श्यामसुंदर पारिख आणि त्याचा साथीदार राजासाब सय्यद याच्याविरोधात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. क्रमांक ०८/२०२३ कलम ३०७, ३६४ (अ), ३८६, १०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी, १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि ४, २५ शस्त्र अधिनियम कायद्यानुसार जानेवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ते गुन्हा घडल्यापासून पाेलिसांना चकवा देत फरार हाेते. त्यांच्या शाेधासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी आदेश दिले हाेते. यासाठी पाेलिस पथाकांनी विविध ठिकाणी शाेध माेहीम राबविली. 

दाेघा आराेपींनी अनेकवेळा वास्तव्याचे ठिकाण बदलले...पोलिस आपल्या मागावर आहेत, याची कुणकुण लागल्याने ते सतत आला ठिकाणा बदलत होते. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाेलिसांनी लातुरातील औसा राेडवर खर्डेकर स्टाॅप परिसरात पाेलिसांनी सापळा लावला. यावेळी पंकज श्यामसुंदर पारिख, (वय २६, रा. भोकरंबा, ता. रेणापूर जि. लातूर), समीर राजासाब सय्यद (वय २०, रा. खाडगाव रोड, लातूर) यांच्या मुसक्या आवळल्या.

जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यात स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल...अटकेत असलेला पंकज श्यामसुंदर पारिख याच्यावर लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, घातक अग्निशस्त्र बाळगणे, त्याचा वापर करणे आदी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर समीर राजासाब सय्यद याच्यावरही मारामारी करणे, धमक्या देणे, जबरी चोरी करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर