लामजना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव फुलारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:53+5:302021-02-08T04:17:53+5:30
अध्यासी अधिकारी एस.व्ही. कपाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी खंडेराव फुलारी, तर उपसरपंचपदासाठी ...

लामजना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव फुलारी
अध्यासी अधिकारी एस.व्ही. कपाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी खंडेराव फुलारी, तर उपसरपंचपदासाठी बालाजी पाटील यांचे एकेक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांना ग्रामविकास अधिकारी एस.के. गिरी, तलाठी एस.एल. हेंबाडे यांनी साहाय्य केले.
येथील ग्रामपंचायत निवडणुकीत लोककल्याण पॅनलच्या १७ पैकी ९ महिला व ४ पुरुष, असे एकूण १३ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे लोककल्याण पॅनलने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवराज पाटील, बंडू पाटील, सोमनाथ सावळकर, सचिन कांबळे, अजय फुलारी, बब्रूवान बिराजदार, बालाजी शिंदे, राम पवार, रहीम शेख, तात्याराव जावळे, असद पटेल, बाळू शिंदे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.