खंडाळीत १३ दिवसांत ४५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:47+5:302021-05-20T04:20:47+5:30
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावची लोकसंख्या ४ हजार ४२५ एवढी आहे. खंडाळी येथील आरोग्य उपकेंद्रात दररोज स्वॅब तपासणीसाठी नागरिकांची गर्दी ...

खंडाळीत १३ दिवसांत ४५ कोरोना पॉझिटिव्ह
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावची लोकसंख्या ४ हजार ४२५ एवढी आहे. खंडाळी येथील आरोग्य उपकेंद्रात दररोज स्वॅब तपासणीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु, गावातील काहीजण विनामास्क फिरत आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्स राखला जात नाही. हॉटेल, किराणा दुकाने सुरु आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे पोलीस पाटीलांनी केली असल्याचे ग्रामविकास अधिकारी अशोक लामदाडे यांनी सांगितले. खंडाळी गावात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. १३ दिवसांच्या काळात ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात २८ पुरूष आणि १७ महिलांचा समावेश आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे. कोरोना संदर्भातील कुठलीही लक्षणे दिसून येताच तात्काळ उपकेंद्रात उपचार घ्यावेत. गर्दीत जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावेत, असे आवाहन उपकेंद्राचे डॉ. नित्यानंद कुंभार यांनी केले आहे.