उदगीर तालुक्यातील ४८ संवेदनशील केंद्रांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:07+5:302021-01-15T04:17:07+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ७.३० वा. पासून ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २२० मतदान ...

Keep a close eye on 48 sensitive centers in Udgir taluka | उदगीर तालुक्यातील ४८ संवेदनशील केंद्रांवर करडी नजर

उदगीर तालुक्यातील ४८ संवेदनशील केंद्रांवर करडी नजर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ७.३० वा. पासून ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २२० मतदान केंद्रांसाठी १ हजार ३२९ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी ईव्हीएम मशीन, मतदार नोंदवही, मतदार यादीची चिन्हांकित प्रत, मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, कोविड किट आदी साहित्य देण्यात आले. झोनल अधिकाऱ्यांसमक्ष सर्व साहित्याची तपासणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना साहित्य सुपुर्द करण्यात आले. निवडणूक कामासाठी ११ पोलीस अधिकारी, २१९ पोलीस कर्मचारी व १५० होमगार्ड नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. निवडणूक कामातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निरीक्षक अनंत कुंभार, नियंत्रण अधिकारी व उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे आदींनी मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेेेळी सर्व क्षेत्रीय अधिकारी, मास्टर ट्रेनर, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, लिपिक व शिपाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Keep a close eye on 48 sensitive centers in Udgir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.