डिगोळच्या सरपंचपदी कविता दासरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:20 IST2021-02-11T04:20:58+5:302021-02-11T04:20:58+5:30
डिगोळ ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून, सरपंचपद एसटी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. येथील निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांच्या पॅनलला ६ ...

डिगोळच्या सरपंचपदी कविता दासरे
डिगोळ ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून, सरपंचपद एसटी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. येथील निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांच्या पॅनलला ६ तर माधवराव बिरादार यांच्या पॅनलला ०३ जागा मिळाल्या होत्या. अध्यासी अधिकारी एस.बी. आडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी सरपंचपदासाठी कविता दासरे तर उपसरपंचपदासाठी बाबासाहेब समर्थराव पाटील यांचा एक-एक अर्ज आल्याने, त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नूतन सदस्य कलावती उमाकांत स्वामी, सुनिता मदन बिरादार, वैशाली अर्जुन सूर्यवंशी, संजय बिरादार, मुबारक गैबीसाब बागवान, पल्लवी गोपाळ वाडकर, राजकुमार आमनवाड यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामसेवक विशाल मनियार, तलाठी एल.एन. कांबळे, पोलीस पाटील महेश पाटील, सोमनाथ स्वामी, पोकॉ. हणमंतराव पनाळे, राहुल बिरादार, हैदर मुंजेवार, अमिन मुंजेवार, महम्मद मुंजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, बाबुराव सूर्यवंशी, अभंगराव बिरादार, रावण सूर्यवंशी, चंद्रकांत शिंदे, धनराज चावरे, प्रमोद पाटील, लहू बिरादार, सलीम मौलासाब मुंजेवार आदीं उपस्थित होते. नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.