कासारशिरसी येथे मनोकामना सिध्दीची उत्साहात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST2021-08-01T04:19:42+5:302021-08-01T04:19:42+5:30

कासारशिरसी : येथील जैन मंदिरात मनोकामना सिद्धी विधानाची उत्साहात सांगता झाली. संपूर्ण जीवसृष्टीसह देशात सुख, शांती लाभावी, कोरोनाचे संकट ...

At Kasarashirsi, Manokamana accomplishes the achievement with enthusiasm | कासारशिरसी येथे मनोकामना सिध्दीची उत्साहात सांगता

कासारशिरसी येथे मनोकामना सिध्दीची उत्साहात सांगता

कासारशिरसी : येथील जैन मंदिरात मनोकामना सिद्धी विधानाची उत्साहात सांगता झाली. संपूर्ण जीवसृष्टीसह देशात सुख, शांती लाभावी, कोरोनाचे संकट दूर व्हावे. सर्वांना आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, प्रत्येक जीवाची मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

येथील जैन मंदिरात आयोजित मनोकामना सिद्धी विधान व चंद्रप्रभू प्रायश्चित्त विधानाची सांगता स्वरसाधनेच्या माध्यमातून झाली. यावेळी जगद्गुरु जीनसेनजी भट्टरकर महाराज यांनी पौरोहित्य केले. कोल्हापूर जिल्ह्यातील संगीतकार कुबेर चौगुले यांची संगीत साधना झाली. यावेळी धर्मप्रसारक नेमचंद आगरे यांनी मंदिराची माहिती दिली. हा कार्यक्रम संमती सेवादलाचे अध्यक्ष जीवन पाटील व येथील समाजबांधवांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजीराव पाटील, सागर पाटील, प्रकाश लोखंडे, सुरेश विजापुरे, माणिक पाटील, सागर देवसाळे, डॉ. भीमराव पाटील, प्रफुल्ल पुंजे, फुलचंद बेळकिरे, सतीश देशमाने, अशोक लोखंडे, किशोर देवसाळे, अनिल लोखंडे, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: At Kasarashirsi, Manokamana accomplishes the achievement with enthusiasm