सरपंचपदी कदम, तर उपसरपंचपदी कांबळे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:56+5:302021-02-09T04:21:56+5:30
माळुंब्रा-तुंगी (खु) या गट ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले हाेते. सरपंचपद सर्वसाधारण गटाला सुटले होते. दरम्यान, आज ...

सरपंचपदी कदम, तर उपसरपंचपदी कांबळे यांची निवड
माळुंब्रा-तुंगी (खु) या गट ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले हाेते. सरपंचपद सर्वसाधारण गटाला सुटले होते. दरम्यान, आज सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रत्येकी अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी विलास गालफाडे यांनी केली. यावेळी ग्रामसेवक भानुदास पाटील, किल्लारी पोलीस ठाण्याचे गणेशकुमार यादव, उमाकांत चपटे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धनराज क्षीरसागर, सतीश सूर्यवंशी, चंद्रकला पुरी, रंजना भाऊराव जगताप, संगीता सूर्यवंशी, बंकट कदम, संजय कदम, सचिन पवार, तानाजी कदम, संतोष माळी, सावता माली, सूर्यकांत पवार, गोविंद कदम, ज्ञानोबा कांबळे, गोविंद क्षीरसागर, साहेबराव पाटील, दत्तू पाटील, सुभाष पाटील, गणपती सूर्यवंशी, गोविंद कांबळे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते