ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; कर्मचाऱ्यांना मानधनाची लागली प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:48+5:302021-03-21T04:18:48+5:30
लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ३८३ ग्रा.पं.साठी ...

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; कर्मचाऱ्यांना मानधनाची लागली प्रतीक्षा
लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ३८३ ग्रा.पं.साठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. या प्रक्रियेसाठी १ हजार ४३२ मतदान केंद्रांवर ५ हजार १७८ कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी निवडणूक काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही.
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ३८३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यामध्ये लातूर तालुक्यातील २३२, रेणापूर ८६, औसा १७४, निलंगा १८०, शिरूर अनंतपाळ ८६, देवणी १०८, उदगीर २२५, जळकोट ८४, अहमदपूर १५५, तर चाकूर तालुक्यातील १०२ अशा एकूण १ हजार ४३२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी सेवा बजावलेल्या ५ हजार ७२८ कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जवळपास १ हजार ४३२ केंद्रांवर मतदान झाले होते. यासाठी ५ हजार ७२८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मानधनासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
तालुकाग्रामपंचायती कर्मचारी
लातूर ६४ ९२८
रेणापूर २८ ३५०
औसा ४६ ६९६
निलंगा ४८ ७२०
शिरूर अनंतपाळ २७ ३५०
देवणी ३४ ४५०
उदगीर ६१ ९००
जळकोट २७ ३५०
अहमदपूर ४९ ६२०
चाकूर २४ ४२०