दागिने, मोबाईलसाठी एकाचा खून (प्रादेशिक)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:59+5:302021-01-18T04:17:59+5:30
हरिदास नागनाथ पेस्टे (वय ४३, रा. लिंबाळवाडी, ता. चाकूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. लिंबाळवाडी येथील हरिदास पेस्टे व ...

दागिने, मोबाईलसाठी एकाचा खून (प्रादेशिक)
हरिदास नागनाथ पेस्टे (वय ४३, रा. लिंबाळवाडी, ता. चाकूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. लिंबाळवाडी येथील हरिदास पेस्टे व बालाजी श्रीपती चात्रे हे लातूर येथील काही मित्रांसोबत पुणे येथे गेले होते. ७ जानेवारी रोजी ते पुण्याहून परत आले. त्यानंतर लातूरहून लिंबाळवाडी गावाकडे निघाले. दरम्यान, आष्टामोडनजीक हरिदास पेस्टे यांचा मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणी करण्यात आली असता हरिदास पेस्टे यांचा खून झाल्याचा वैद्यकीय अहवाल शनिवारी प्राप्त झाला.
त्यावरून हरिदास पेस्टे यांचा मुलगा सिद्धेश्वर पेस्टे यांनी याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. लातूरहून येताना माझे वडील हरिदास पेस्टे यांच्याकडे सोन्याचे दागिने व मोबाईल होता. बालाजी चात्रे याने वडिलांचा खून करून दागिने, मोबाईल लंपास केला. त्यावरून कलम ३०२, ३९४ भादंविनुसार शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत, पोहेकॉ. भागवत मामडगे करीत आहेत.
चार दिवसांची पोलीस कोठडी...
याप्रकरणी चाकूर पोलिसांनी आरोपीस अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.