भरधाव ट्रकची जीपला धडक; अज्ञात चालकाविराेधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:29+5:302021-08-26T04:22:29+5:30

पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी गाेविंद संतराम साेमवंशी (वय ५५, रा. चाकूर) यांच्या ताब्यातील जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने जाेराची धडक ...

Jeep hit by jeep; Crime against an unknown driver | भरधाव ट्रकची जीपला धडक; अज्ञात चालकाविराेधात गुन्हा

भरधाव ट्रकची जीपला धडक; अज्ञात चालकाविराेधात गुन्हा

पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी गाेविंद संतराम साेमवंशी (वय ५५, रा. चाकूर) यांच्या ताब्यातील जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने जाेराची धडक दिली. हा अपघात लातूर-नांदेड महामार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात साेमवारी (दि.२३) दहा वजेच्या सुमारास घडला. या अपघातात जीपचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून २४ ऑगस्ट राेजी अज्ञात ट्रकचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस नाइक जहागीरदार करीत आहेत.

अपघाताचा वळण रस्ता...

लातूर ते नांदेड महामार्गावरील कृषी महाविद्यालयानजीकचा वळण रस्ता अपघाताचे केंद्र ठरला आहे. लातूरपासून अवघ्या दाेन किलाेमीटर अंतरावर असलेल्या ब्लॅक स्पाॅटमुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. परिणामी याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष हाेत आहे. भरधाव वाहनचालकाचा वळणावर ताबा सुटताे आणि अपघात हाेताे. यातून जीवितहानी माेठ्या प्रमाणावर हाेते. लातूर ते आष्टामाेडदरम्यान या एकाच वळणावर बहुतांश अपघात झाल्याची नाेंद पाेलीस दप्तरी आहे.

Web Title: Jeep hit by jeep; Crime against an unknown driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.