जळकोट बाजार समितीसाठी सर्वतोपरी मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST2021-09-02T04:43:29+5:302021-09-02T04:43:29+5:30

जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे प्रमुख अर्जुन पाटील आगलावे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यमंत्री संजय बनसाेडे यांची भेट ...

Jalkot will do its utmost to help the market committee | जळकोट बाजार समितीसाठी सर्वतोपरी मदत करणार

जळकोट बाजार समितीसाठी सर्वतोपरी मदत करणार

जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे प्रमुख अर्जुन पाटील आगलावे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यमंत्री संजय बनसाेडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी बाजार समितीचे संचालक महेताब बेग, दत्ता पवार, श्रीकृष्ण पाटील, गजानन दळवे, दिलीप कांबळे, उमाकांत सोनकांबळे यांची उपस्थिती होती. जळकोट बाजार समिती परिसरात विविध विकासकामे करण्यासाठी तसेच शेतकरी, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून आर्थिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट बाजार समिती एक चांगली आणि मुख्य आहे. बाजार समितीच्या विविध विकासकामांसाठी तसेच शेतकी भवन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, उर्वरित राहिलेले पक्के रस्ते आणि शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. शासनाच्या पणन महासंघाच्या वतीने आर्थिक निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

Web Title: Jalkot will do its utmost to help the market committee