यशवंत विद्यालय जिल्ह्यात चतुर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST2021-02-12T04:18:51+5:302021-02-12T04:18:51+5:30
तंबाखूमुक्त, आरोग्यसंपन्न मुले निर्माण होण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन नऊ निकष लागू केले आहेत. त्या पत्राच्या आधारे मुंबईच्या सलाम फाऊंडेशच्या ...

यशवंत विद्यालय जिल्ह्यात चतुर्थ
तंबाखूमुक्त, आरोग्यसंपन्न मुले निर्माण होण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन नऊ निकष लागू केले आहेत. त्या पत्राच्या आधारे मुंबईच्या सलाम फाऊंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक बालाजी बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील उपक्रमशील कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभियान यशस्वीपणे शाळेत राबविले.
शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूमुक्त परिसर व तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचा फलक शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर आवश्यक असून, या शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापर केल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येईल, असा सूचना फलक दर्शनी भागात लावले आहेत.
शैक्षणिक संस्थेत मागील वर्षभरात एक तंबाखूमुक्त नियंत्रणावर आधारित उपक्रम राबविणे, रांगोळी स्पर्धा, जनजागृती प्रभातफेरी, एक पत्र व्यसनमुक्तीसाठी, तंबाखूजन्य पदार्थाची होळी, एक पणती व्यसनमुक्तीसाठी, आपट्याच्या पानावरून तंबाखूचे दुष्परिणाम यावर जनजागृती, तंबाखूमुक्तीची शपथ, सहामाही परीक्षेतून व्यसनमुक्तीची जनजागृती असे अनेक उपक्रम विद्यालयात राबविले आहेत.
शालेय परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, सेवन करणे, विक्री करण्यावर बंदी आहे. शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसर पिवळ्या रंगाचे रेखांकित करून तेथे तंबाखूमुक्त क्षेत्र असे लिहिले आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात नाही.
या सर्व निकषाची पूर्तता केल्याने सलाम मुंबई फाऊंडेशनकडून शाळेला दोन वर्षांसाठी तंबाखूमुक्त शाळा असे प्रमाणपत्र दिले जाते.
यशवंत विद्यालयातील कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी मुख्याध्यापक बालाजी बिरादार, रामलिंग तत्तापुरे, राजकुमार पाटील, कपिल बिरादार, गौरव चंवडा, सतीश बैकरे, शरद करकनाळे यांच्या सहकार्याने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून जिल्ह्यात संस्थेच्या शाळेतून पहिला क्रमांक पटकाविला. शाळेच्या या यशाबद्दल डायटचे प्राचार्य, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, मुरकुटे, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी नानासाहेब बिडवे, संस्थेचे सचिव डी.बी. लोहारे गुरुजी, उपमुख्याध्यापक प्रेमचंद डांगे, पर्यवेक्षक रमाकांत कोंडलवाडे, उमाकांत नरडेले आदींनी कौतुक केले.