जनसामान्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST2021-07-25T04:17:43+5:302021-07-25T04:17:43+5:30

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा लातूर : मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक ...

It is important to look after the public interest | जनसामान्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

जनसामान्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा

लातूर : मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख उपस्थित होते. विद्यार्थ्यांना महापुरुषांची ओळख व्हावी, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका रुपाली कोकाटे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन शिक्षिका नम्रता झांबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

निखिल शिवाजी गायकवाड यांना ‘समाजभूषण पुरस्कार’

लातूर : कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांचे, हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत होते. अशा अडचणीच्या प्रसंगी निखिल गायकवाड यांनी हडको प्रभागातील लोकांच्या घरोघर जाऊन दैनंदिन भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. रमाई अन्नसेवा योजनेच्या माध्यमातून दररोज पाचशेहून अधिक डबे रुग्णांच्या नातेवाईकांना पुरवले. या कार्याबद्दल त्यांचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, रत्नराज जवळगेकर, पूजा निचळे, आकाश गडगडे, विशाल सावंत, गजू गुगळे उपस्थित होते.

लातूर शहरात अभिवादन कार्यक्रम

लातूर : येथील लोकमान्य टिळक चौकात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, बाळासाहेब देशपांडे, संजय निलेगावकर, हरिराम कुलकर्णी, पंडित रघुत्तम आचार्य जोशी, डॉ. श्रीनिवास संदीकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, दुभाजकातील कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी मुख्य मार्गातील दुभाजकात कचरा टाकला जात आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होता. या काळात विजेचा लंपडाव सुरु होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे होऊनही विजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नियमित वीजबिलांचा भरणा करुनही विजेची समस्या कायम असल्याने याकडे महावितरणने लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

Web Title: It is important to look after the public interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.