अहमदपूर मतदारसंघात सिंचन क्षेत्र वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:29+5:302021-06-27T04:14:29+5:30
येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री ...

अहमदपूर मतदारसंघात सिंचन क्षेत्र वाढविणार
येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, बस्वराज पाटील नागराळकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सुनील गव्हाणे, सुनील चव्हाण, आशा भिसे, यशपाल भिंगे यांची उपस्थिती होती.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, आ. बाबासाहेब पाटील यांनी मन्याड नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करावे, अशी मागणी करुन पाठपुरावा करीत आहेत. बॅरेजेस
उभारणीचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल.यावेळी आ. बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघातील साठवण तलावाची गळती थांबविण्यासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी केली.
कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील, जि.प. सदस्य माधव जाधव, चाकूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी काळे, करिम गुळवे, अजहर बागवान, शिवाजी खांडेकर, गणेश फुलारी, प्रशांत भोसले, राजाभाऊ शिंदे, डी.के. जाधव, दयानंद पाटील, नगरसेवक अभय मिरकले, आशिष तोगरे, डाॅ. फुजैल जहागीरदार, सभापती अनुराधा नळेगावकर, सय्यद लाल सय्यद सरवर, नगरसेविका महानंदा डावरे, तानाजी राजे, हुसेन मणियार, फेरोज शेख, अनिस कुरेशी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आ. बाबासाहेब पाटील, सूत्रसंचालन प्रा. माने यांनी केले.