बोरोळ, दवणहिप्परग्याच्या फुटलेल्या पाझर तलावाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:33+5:302021-05-25T04:22:33+5:30
देवणी तालुक्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नाले, नदी व तलाव तुडुंब भरले होते. अतिवृष्टीमुळे बोरोळ व दवणहिप्परगा येथील पाझर तलाव ...

बोरोळ, दवणहिप्परग्याच्या फुटलेल्या पाझर तलावाची पाहणी
देवणी तालुक्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नाले, नदी व तलाव तुडुंब भरले होते. अतिवृष्टीमुळे बोरोळ व दवणहिप्परगा येथील पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी भेट देऊन फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित विभागाला सूचना केल्या.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी देवणी येथील लासोना चौकात उपस्थित असलेल्या प्रशासनाच्या पथकाची पाहणी केली. तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती जाणून घेऊन काही सूचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस उपनिरीक्षक रंजित काथवटे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.