पीव्हीआर चौक ते राजस्थान विद्यालय समांतर रस्त्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:53+5:302021-06-25T04:15:53+5:30
लातूर : शहरातील पीव्हीआर चौक ते राजस्थान विद्यालय या जुन्या रेल्वेमार्ग असलेल्या समांतर रस्त्याची पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी ...

पीव्हीआर चौक ते राजस्थान विद्यालय समांतर रस्त्याची पाहणी
लातूर : शहरातील पीव्हीआर चौक ते राजस्थान विद्यालय या जुन्या रेल्वेमार्ग असलेल्या समांतर रस्त्याची पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी पाहणी केली. सदरील रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, किरण जाधव, समद पटेल, बंटी जाधव, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, तहसीलदार स्वप्नील पवार, उपअभियंता रोहन जाधव उपस्थित होते. पालकमंत्री अमित देशमुख यांनी जुन्या रेल्वे लाईनच्या रस्त्याची पी. व्ही. आर. चौक, वाल्मिक नगर चौक, पाण्याची टाकी, दयानंद गेट, शिवाजी चौक, देशिकेंद्र शाळेजवळचा पूल, राजस्थान विद्यालयासमोरील रस्ता याठिकाणी थांबून रस्त्यावरील अतिक्रमणे, पार्किंग व्यवस्था या बाबींची पाहणी केली. सद्यस्थितीत महात्मा गांधी चौक ते पीव्हीआर चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या जुन्या रेल्वे लाईनच्या रस्त्यावरील अतिक्रमणे मोकळी करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची टाकी ते दयानंद गेटपर्यंत जे भाजी विक्रेते बसतात त्यांच्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व महापालिकेने एकत्रित बसून याबाबत नियोजन करावे. तसेच या रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पेठ येथे वृक्षारोपण...
पालकमंत्री अमित देशमुख यांनी पेठ येथील वन विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी येथील परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वन विभागाच्या ताब्यात असलेल्या येथील जागेची त्यांनी पाहणी केली.