तहसीलमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:11+5:302021-05-27T04:21:11+5:30
सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी व्यवसाय सेवा कर कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याची येथील तहसील कार्यालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ...

तहसीलमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी करावी
सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी व्यवसाय सेवा कर कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याची येथील तहसील कार्यालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यानंतर व्यवसाय कर कार्यालयातून त्या कर्मचाऱ्याचा कार्यालयीन उपस्थिती सेवापट व तहसीलदारांच्या प्रमाणपत्राची वारंवार मागणी झाली. सदरील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असताना लोकसभा, विधानसभा निवडणूक तसेच वडवळ (नागनाथ) जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत कोणती कामे केली. तहसील कार्यालयातील हजेरी पट पहावे. त्याची सत्यप्रत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधितांवर तहसीलदारांनी कोणते कार्यालयीन कामकाज सोपविले. त्या आदेशाची पडताळणी करावी. तीन वर्षांपासून ती महिला कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे. या काळातील त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासावे. त्या तहसीलमध्ये कोठे बसत होत्या, याची माहिती द्यावी. निवडणुकीनंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसून केल्याने खातेनिहाय चौकशी करावी. तीन वर्षांतील त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी मागणी सुधाकरराव लोहारे यांनी केली आहे.
तसेच तहसीलमध्ये विनाकारण लोकांचा वावर वाढला आहे. तहसीलसह शहरातील सर्व कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे कंट्रोल ठेवावे, अशी मागणीही लोहारे यांनी केली आहे.
आदेशाची प्रतीक्षा...
सुधाकर लोहारे यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. सदरील महिला कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांचा आदेश येताच कार्यमुक्त केले जाईल, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगितले.