मृत्यूप्रकरणी चौकशी समिती
By Admin | Updated: February 15, 2017 03:20 IST2017-02-15T03:20:11+5:302017-02-15T03:20:11+5:30
रेणापूर तालुक्यात एका निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांनी तीन सदस्यीय चौकशी समिती

मृत्यूप्रकरणी चौकशी समिती
लातूर : रेणापूर तालुक्यात एका निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. रेणापूर तालुक्यातील बावची येथील निवासी शाळेत बालिका विनायक चिकटे हिला ताप येऊन उलटी झाल्याने तिला कर्मचाऱ्यांनी रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार केल्यानंतर तिला परत पाठवले. मात्र शनिवारी तिला पुन्हा ताप आणि उलट्या झाल्या. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)