न्युमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:19+5:302021-07-14T04:23:19+5:30
सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार व लसीकरणाचे नाेडल ऑफिसर डॉ. सी.एच. रामशेट्टी म्हणाले, न्युमोकोकल न्युमोनिया हा आजार ...

न्युमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणास प्रारंभ
सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार व लसीकरणाचे नाेडल ऑफिसर डॉ. सी.एच. रामशेट्टी म्हणाले, न्युमोकोकल न्युमोनिया हा आजार न्युमोकोकल बॅक्टेरियामुळे होतो. या आजारामुळे ० ते ५ वर्ष वयोगटातील बालके बाधित होतात. हा आजार होऊ नये म्हणून लसीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयातच या आजाराचे लसीकरण करण्यात येत होते. यापुढे सर्व शासकीय रुग्णालयातून ही लस दिली जाणार आहे.
पहिला डोस ६ आठवडे, दुसरा १४ आठवडे व तिसरा ९ महिन्यानंतर दिला जातो. दर सोमवार व गुरुवारी सकाळी ९ ते २ या वेळेत ही लस दिली जाणार आहे. तसेच शहरातील वाॅर्डात महिन्यातून एकदा लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस देऊन बालकांचे संरक्षण करावे, असेही डॉ. पवार, डॉ. रामशेट्टी यांनी केले आहे.