कासार बालकुंदा सरपंचपदी प्रभावती नायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:55+5:302021-02-14T04:18:55+5:30
सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी प्रभावती नायब आणि प्रदीप कोडे यांनी अर्ज दाखल केले हाेते, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ...

कासार बालकुंदा सरपंचपदी प्रभावती नायब
सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी प्रभावती नायब आणि प्रदीप कोडे यांनी अर्ज दाखल केले हाेते, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे आणि नितीन पाटील यांच्या भाजपप्रणीत परिर्वतन विकास पॅनलकडून १३ पैकी ६ उमेदवार निवडून आले होते. यासाठी सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी सिम्निता बेस्ते आणि श्रीमंत मोरे यांनी अर्ज दाखल केले हाेते. यावर मतदान घेण्यात आले. यामध्ये बेस्ते व मोरे यांना ६ मते, तर नायब व कोडे यांना ७ मते पडली. एका मताने विजयी घोषित करण्यात आले. गत ४५ वर्षांपासून ग्रामपंचायतीवर असलेली पकड माजी सभापती हाल्लाप्पा कोकणे यांनी कायम ठेवली आहे, तर माजी जि.प.अध्यक्ष लातुरे आणि नितीन पाटील यानी पहिल्यांदाच आपले ६ उमेदवार निवडून आणत ग्रामपंचायतीच्या विरोधी बाकावर उमेदवार बसवल्याने गटात समाधान व्यक्त हाेत आहे. यावेळी ग्रामसेवक आर.सी. धर्मशेट्टी, आप्पासाहेब पाटील, गणपतराव कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई आचार्य, रावसाहेब कल्याणकर, अण्णा नायब, राम सूर्यवंशी, विश्वनाथरेड्डी मरे, किशोर पाटील, तानाजी दरेकर, जनार्दन कोडे, माधवराव मेंडोळे, रहेमान शेख, बाबूराव सारगे, आतिष काळे, संजीव गोपाळे यांनी काैतुक केले आहे.