शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
2
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
3
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
4
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
5
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
6
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
7
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
8
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
9
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
10
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
12
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
13
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
14
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
15
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
16
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
17
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
18
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
19
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
20
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात आवक वाढली; साेयाबीनचे दर गडगडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक हाेताच प्रति क्विंटलचे दर गडगडले आहेत. एका आठवड्यात तब्बल तीन ...

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक हाेताच प्रति क्विंटलचे दर गडगडले आहेत. एका आठवड्यात तब्बल तीन हजारांनी भावामध्ये घसरण झाल्याने साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. त्यांना प्रति क्विंटल तीन हजारांचा झटका सहन करावा लागत आहे. १६ सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात साेयाबीनला सर्वसाधारण भाव ८ हजार ९१० रुपयांचा मिळाला आहे, तर मंगळवारी तो प्रति क्विंटलला ६ हजार १५० रुपयांवर घसरला आहे.

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत महिनाभरात तब्बल दहा हजारांवर भाव मिळाला हाेता. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव साेयाबीनला मिळाला आहे. मात्र, आवक अत्यल्प हाेती. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा यासाठी घरातच ठेवलेले साेयाबीन या काळात विक्रीसाठी बाजार समिती, आडत बाजारात आणले हाेते. ज्यांनी भाव पाहून साेयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले, त्यांच्या साेयाबीनला दुप्पट भाव मिळाला आहे. मात्र, असे शेतकरी फार कमी आहेत. सध्याला यंदाच्या हंगामातील नवीन साेयाबीनची साेमवार, मंगळवारी माेठ्या प्रमाणावर आवक झाली अन् भाव चक्क गडगडत ६ हजारांवर आले. यातून प्रति क्विंटल तब्बल तीन हजारांची घसरण झाली आहे. १६ सप्टेंबर राेजी लातुराच्या बाजारात साेयाबीनची १ हजार २९७ क्विंटल आवक झाली. याला कमाल भाव ९ हजार १००, किमान भाव ८ हजार ७०० आणि सर्वसाधारण भाव ८ हजार ९१० रुपयांचा मिळाला आहे.

१८ सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात १ हजार २८९ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. याला कमाल भाव ८ हजार ९९१ रुपयांचा मिळाला. किमान भाव ६ हजार २०१ रुपये, तर सर्वसाधारण भाव ८ हजार ७८० रुपयांचा मिळाला आहे. त्यापाठाेपाठ साेमवार, २० सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात २ हजार ८५७ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. प्रति क्विंटलला कमाल भाव ६ हजार २९१ रुपये मिळाला, तर किमान भाव ५ हजार ५० रुपये आणि सर्वसाधारण भाव ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. मंगळवारी लातूरच्या बाजारात ५ हजार २२६ क्विंटलची आवक झाली असून, भाव मात्र गडगडले. साेयाबीनला कमाल भाव ६ हजार ३०० रुपयांचा मिळाला. किमान भाव ४ हजार ६०१ रुपये आणि सर्वसाधारण भाव हा ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. परिणामी, प्रति क्विंटल जवळपास ३ हजारांचा फरक पडला आहे. भाव घसरल्याने साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जुलैमध्ये मिळाला रेकाॅर्डब्रेक भाव...

लातूर आणि उदगीर येथील बाजार समितीत जुलै महिन्यात साेयाबीनचे भाव १० हजारांपेक्षा अधिक हाेते. आजपर्यंतचा हा भाव रेकाॅर्डब्रेक हाेता. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण हाेते. मात्र, सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांच्या साेयाबीनची माेठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आणि भाव गडगडले. साेमवार, मंगळवारी तर चक्क ३ हजारांच्या घरात घसरण झाली. १८ सप्टेंबरला ६ हजार २०० रुपयांचा भाव असला तरी, पाेटलीतला भाव हा ५ हजार ५०० रुपयांच्या घरातच हाेता. ज्यावेळी ओलावा आणि माती असल्याचे कारण सांगितले जाते, त्यावेळी शेतकऱ्यांना आहे त्या भावापेक्षा कमी भावात शेतीमाल विकावा लागताे.