किनगावात संसर्ग वाढला; २०५ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:28+5:302021-04-18T04:19:28+5:30
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ ते १६ एप्रिल या कालावधीत २९९ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८६ पॉझिटिव्ह ...

किनगावात संसर्ग वाढला; २०५ कोरोना बाधित
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ ते १६ एप्रिल या कालावधीत २९९ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८६ पॉझिटिव्ह आढळले. तसेच ४३७ जणांनी अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यात ११९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण ७३६ जणांची तपासणी करण्यात आली असता २०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ४५ वर्षांवरील २ हजार ७५१ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थात्मक क्वॉरंटाईन व्हावे...
जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत, अशांना मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. मात्र, काहीजण तिथे दाखल न होता, स्वतःच्या घरी राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढत आहे. संदर्भित केलेल्या रुग्णांनी घरी न राहता कोविड केअर सेंटरला जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ. प्रमोद सांगवीकर, वैद्यकीय अधिकारी.