उदगीर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:56+5:302021-08-17T04:25:56+5:30

नगरपालिका : उदगीर पालिकेत नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ देण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी ...

Independence Day festivities at Udgir | उदगीर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

उदगीर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

नगरपालिका : उदगीर पालिकेत नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ देण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी भारत राठोड, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, मंजुरखाँ पठाण, ॲड. दत्ताजी पाटील आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी कार्यालय : उदगीर येथील उपविभागीय कार्यालयात उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी वृक्षारोपण करून त्या वृक्षाची पूजन करण्यात आली. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे आदी उपस्थित होते.

आडत असोसिएशन : उदगीर येथील आडत व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष संभाजी घोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी सचिव गुरुनाथ बिरादार, पी.पी. पाटील, पंढरीनाथ गुनाले, शेषराव बिरादार आदी उपस्थित होते.

Web Title: Independence Day festivities at Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.