जिल्हाभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:49+5:302021-08-17T04:25:49+5:30
देवणी : येथील तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते पार पडला. येथील न्यायालयात न्यायमूर्ती ...

जिल्हाभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
देवणी : येथील तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते पार पडला. येथील न्यायालयात न्यायमूर्ती यु. बी. काळपगार, पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड, पंचायत समितीत सभापती सविता पाटील, बाजार समितीत सभापती बालाजी बिरादार, नगर पंचायतीत प्रभारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, ग्रामीण रुग्णालयात डॉ. नीळकंठ सगर, कृषी कार्यालयात कृषी अधिकारी बापूसाहेब पाटील, महावितरणमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता पी. एस. कटकधोंड, सार्वजनिक बांधकाममध्ये अभियंता एस. एस. पुजारी, सोसायटीत चेअरमन विजयकुमार लुल्ले, विवेकवर्धनी महाविद्यालयात सचिव भगवानराव पाटील, पंडित दिनदयाल उपाध्याय महाविद्यालयात मठाधीश सिद्धलिंग स्वामी, रसिका महाविद्यालयात सचिव गजानन भोपणीकर, योगेश्वरीदेवी विद्यालयात प्राचार्य यशवंत पाटील, माता नर्गिस दत्त विद्यालयात अध्यक्ष नागेश जीवने, जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापक गणेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापक बसवराज बिरादार, गुलशन ए आत्तफाल उर्दू शाळेत मुख्याध्यापिका जरिना बेगम पठाण, किसनराव जाधव आश्रमशाळेत मुख्याध्यापक बक्षमियाँ सौदागर, स्टेट बँक ऑफ इंडियात शाखाधिकारी संभाजी टमके, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक भगवानराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.