विकास कामांसाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:20+5:302020-12-15T04:36:20+5:30
रेणापूर शहरातील संभाजी नगर, सरोजनी राजे नगर, नगरपंचायत ते महात्मा बसवेश्वर चौक, काळेवाडी, रेणुका नगर, माऊली नगर, कुंभार गल्ली, ...

विकास कामांसाठी बेमुदत उपोषण
रेणापूर शहरातील संभाजी नगर, सरोजनी राजे नगर, नगरपंचायत ते महात्मा बसवेश्वर चौक, काळेवाडी, रेणुका नगर, माऊली नगर, कुंभार गल्ली, कुरे गल्ली, रेड्डी कॉलनी आदी ठिकाणचे कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे या भागात चिखल होत आहे. तिथे पक्के रस्ते तयार करावेत. सन २०१९ मधील बोअर अधिग्रहणाचे बिल अदा करावे. शहरात नियमित स्वच्छता करावी. संजयनगर ते काळेवाडी येथील कुटुंबांना कबाले द्यावेत. तेथील रहिवाशांसाठी घरकूल योजना राबवावी. पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा विविध मागण्यांसाठी विलासराव देशमुख युवा मंचची शहर शाखा व युवक काँग्रेसच्या वतीने यापूर्वी निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नसल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतरही दाखल न घेतल्यामुळे सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. आंदोलनात सचिन इगे, प्रदीप काळे आदी सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांना
काँग्रेस गटनेते व काँग्रेस नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.
***