खड्डेमय रस्त्याने वाढला प्रवासाचा वेळ दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:09+5:302020-12-14T04:33:09+5:30
लातूर जिल्ह्यात वाढतेय महामार्गाचे जाळे... लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी-नागपूर, गुलबर्गा-औसा, जहिराबाद-परभणी हे महामार्ग जात आहेत. सध्या रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे ...

खड्डेमय रस्त्याने वाढला प्रवासाचा वेळ दुप्पट
लातूर जिल्ह्यात वाढतेय महामार्गाचे जाळे...
लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी-नागपूर, गुलबर्गा-औसा, जहिराबाद-परभणी हे महामार्ग जात आहेत. सध्या रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने लातूर ते नांदेड रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. खड्डयांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाहनधारक पुरते वैतागले आहेत. महामार्गाचे जाळे वाढत असताना खराब झालेल्या रस्त्यांच्या डागडुजीकडे कोणी लक्ष देत नसल्याने रस्त्यांसाठी ओरड वाढत चालली आहे.
मुंबई, पुण्यासाठी बदलला मार्ग...
लातूर ते पुणे मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. या मार्गावरून दररोज जवळपास दीडशेहून अधिक ट्रॅव्हल्स धावतात. मात्र, लातूर ते टेंभुर्णीपर्यंत अत्यंत अरूंद रस्ता आहे. या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदरील कामासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ओरड आहे. खाजगी वाहनांतून मुंबई, पुण्याला जाणारे अनेकजण सोलापूर मार्गाने जात आहेत. खराब रस्त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी खर्च कराव्या लागत आहेत.
नांदेड-लातूरसाठी केले आंदोलन...
लातूर ते नांदेड रस्त्याचे काम रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे असल्याने खड्डयांकडे दुर्लक्ष करण्यात आले. नांदेड,अहमदपूर, चाकूर, शिरूर ताजबंद, उदगीर, जळकोट आदी भागातून लातूरला येण्यासाठी दुप्पट कालावधी लागतो. खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांची ओरड वाढल्याने आ. बाबासाहेब पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणच्या नांदेड कार्यालयासमोर उपाेषण करून लक्ष वेधले आहे.