स्वतःची ओळख लपवित संपर्क वाढवला; लग्नाचे अमिष देत अत्याचार करून पसार झाला
By हरी मोकाशे | Updated: February 25, 2023 16:39 IST2023-02-25T16:38:57+5:302023-02-25T16:39:31+5:30
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वतःची ओळख लपवित संपर्क वाढवला; लग्नाचे अमिष देत अत्याचार करून पसार झाला
उदगीर : शहरातील एका भागातील महिलेची एकाने ओळख करून घेतली. स्वतःची ओळख लपवित प्रेम संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखविले आणि सतत अत्याचार केला. त्यानंतर तो घरातून निघून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशीरा उदगीर शहर पोलिसांत आरोपीविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील एका भागात राहणाऱ्या पिडित महिलेची आरोपी बबलू इस्माईल सय्यद याने २०११ मध्ये ओळख करून घेतली. त्यानंतर स्वतःचे नाव लपवून प्रेम संबंध ठेवले. पिडित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केला. दरम्यान, एक मुलगी झाली. १० नोव्हेंबर २०२२ रोजी तो कुणालाही न सांगता घरातून निघून गेला, अशी तक्रार पीडित महिलेने शुक्रवारी रात्री उशिरा केली आहे. त्यावरुन आरोपी बबलू इस्माईल सय्यद याच्याविरुद्ध अत्याचार व फसवणुकीच्या कलमान्वये शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.