भूसंपादनाचा वाढीव मावेजा शेतकऱ्यांना द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:07+5:302021-07-14T04:23:07+5:30
अहमदपूर शहरालगत असलेले सर्वे क्र. १२६, १२४, १२५, १२३, ६६, ६७, ७२, ७१, ७५, ७४, ६८ मधील जमीन महामार्गासाठी ...

भूसंपादनाचा वाढीव मावेजा शेतकऱ्यांना द्यावा
अहमदपूर शहरालगत असलेले सर्वे क्र. १२६, १२४, १२५, १२३, ६६, ६७, ७२, ७१, ७५, ७४, ६८ मधील जमीन महामार्गासाठी सन २०१६ मध्ये संपादित झाली. त्याचा दर प्रति चौरस मीटर २ हजार ९०२ रुपये असा भूसंपादन अधिकाऱ्यांनी ठरविला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या लवादाकडे अपिल केले. त्यात २०२० मध्ये निकाल होऊन ६७९ रुपये प्रति चौरस मीटर रक्कम मंजूर झाली. ती अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या निर्णयात बदल करून जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवून वाढीव रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर श्याम भगत, लक्ष्मण चेवले, सुभाष चेवले, कैलास भगत, धर्मराज चावरे, पठाण मगदुम, एस.के. इब्राहिम, वसंत डावरे, दिनेश भगत, बाबुराव भगत, गोविंद शेळके, अनिल फुलारी, ज्ञानोबा बिलापटे, बालाजी बोबडे, शेख मुस्ताक, मोहम्मद ईसाक बक्षी आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.