चाेरीच्या घटनांत वाढ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:35+5:302021-07-08T04:14:35+5:30

पोलीस कर्मचारी वाढविणे गरजेचे... वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसविणे, रात्रीच्या गस्तीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. ठाण्याअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील ...

Increase in theft cases ... | चाेरीच्या घटनांत वाढ...

चाेरीच्या घटनांत वाढ...

पोलीस कर्मचारी वाढविणे गरजेचे...

वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसविणे, रात्रीच्या गस्तीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. ठाण्याअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील माकणी, तेलगाव, मेथी, मुळकी उमरगा, उमरगा यल्लादेवी, फुलसेवाडी, टाकळगाव, गादेवाडी तर रेणापूर तालुक्यातील कारेपूर, सय्यदपूर, यशवंतवाडी, धवेली, गोपाळवाडी, आसराचीवाडी, कवठाळी, तळणी, मोहगावचा समावेश आहे. चाकूर ठाण्यापासून बऱ्याच अंतरावर ही गावे आहेत. एखाद्या गावात घटना घडली तर त्या गावात वेळेवर पोलिसांना पोहोचणे कठीण आहे. ठाण्यात २ पोलीस उपनिरीक्षक, ७ जमादार, १० पोकॉ, ४ महिला पोलीस कर्मचारी वाढविणे गरजेचे आहे.

अवैध धंद्यांना पायबंद...

ठाण्याअंतर्गतची गावे आणि कर्मचाऱ्यांची संख्या पाहता आणखीन कर्मचाऱ्यांची येथे गरज आहे. काही दिवसांत कर्मचाऱ्यांच्या बदल्या आहेत. त्या झाल्यावर नवीन पोलीस येथे येतील. त्यावर बीट अंमलदार बदलण्यात येणार आहेत. शहरासह तालुक्यात कोठेही अवैध दारू विक्री, अवैध व्यवसाय कदापिही चालू देणार नाही.

- सोपान सिरसाट, पोलीस निरीक्षक, चाकूर.

Web Title: Increase in theft cases ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.