औरादमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:31+5:302021-08-25T04:25:31+5:30
औराद गावातील लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. बाजारपेठेमुळे दरराेज परिसरातील ३० ते ३५ गावातील नागरिक व्यवहारासाठी ये-जा करतात. ...

औरादमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ
औराद गावातील लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. बाजारपेठेमुळे दरराेज परिसरातील ३० ते ३५ गावातील नागरिक व्यवहारासाठी ये-जा करतात. त्यामुळे या नागरिकांचीही अस्वच्छतेमुळे गैरसोय होत आहे. बाजारपेठेला जाणाऱ्या रस्त्या तर चिखलमय झाल्याने रस्त्यावरुन जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अस्वच्छतेमुळे गावातील प्रभागातून जवळपास पाच ते सहा रुग्ण हे डेंग्यूसदृश आढळून येत आहेत. औराद सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावाला एक स्वतंत्र ग्रामसेवक आवश्यक असताना ही निलंगा गटविकास अधिकारी यांनी याविषयी गांभीर्याने नोंद घेऊन पूर्णवेळ एक ग्रामसेवक देण्याची मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.
स्वच्छता मोहीम राबविणार...
शहरातील नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरु आहे. कचऱ्यांची ढीग उचलले जात आहे. तसेच साथींच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रभागात धूर फवारणी मोहीम राबविली जात असल्याचे ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे यांनी सांगितले.