उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण अपूर्ण; तिसरी लाट कशी रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:01+5:302021-07-21T04:15:01+5:30
लसीकरणाबाबत उदासीनता का? आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी लसीबाबत समज-गैरसमज असल्याने डोस पूर्ण ...

उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण अपूर्ण; तिसरी लाट कशी रोखणार?
लसीकरणाबाबत उदासीनता का?
आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी लसीबाबत समज-गैरसमज असल्याने डोस पूर्ण होऊ शकले नाहीत.
अनेक हेल्थ केअर व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला नाही. सामान्य नागरिक लसीकरणासाठी आता गर्दी करीत आहेत. मात्र, त्यांनाही लस मिळत नाही, अशी स्थिती आहे.
आरोग्याशी संबंधित असलेले कर्मचारीच समज-गैरसमजात होते. त्यामुळे त्यांच्यासाठी लस उपलब्ध असतानाही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही.
बहुतांश फ्रंटलाइन आणि हेल्थ केअर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. पहिल्या डोसच्या वेळी दिलेला मोबाइल नंबर दुसऱ्या वेळी वेगळा दिला, त्यामुळे ही संख्या कमी दिसत आहे. त्याची पडताळणी सुरू आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांचे दोन्हीही डोस पूर्ण झालेले आहेत.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी