बाजार समितीत ४ हजार ३०० क्विंटल हरभऱ्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:16+5:302021-06-28T04:15:16+5:30

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी ४ हजार ३०७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. त्याला ४ हजार ९५२ ...

Income of 4,300 quintals of gram in the market committee | बाजार समितीत ४ हजार ३०० क्विंटल हरभऱ्याची आवक

बाजार समितीत ४ हजार ३०० क्विंटल हरभऱ्याची आवक

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी ४ हजार ३०७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. त्याला ४ हजार ९५२ रुपयांचा कमाल, ४ हजार ५०० रुपये किमान, तर ४ हजार ८४० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.

यासोबतच बाजार समितीत शनिवारी गूळ ४३३, गहू १५१५, हायब्रीड ज्वारी ९, रब्बी ज्वारी २७८, पिवळी ज्वारी ८७, बाजरी १२, तूर १ हजार ६४४, मूग ७९, उडीद ८९, एरंडी ६, करडई ४०, धने ५, तर १०१ क्विंटल चिंचोक्याची आवक झाली. गुळाला ३ हजार २७०, गहू २२००, हायब्रीड ज्वारी ११००, रब्बी ज्वारी १७००, पिवळी ज्वारी २३००, बाजरी १३००, हरभरा ४ हजार ८४०, तूर ६ हजार ३९०, मूग ५ हजार ८००, उडीद ५ हजार ५००, एरंडी ४ हजार ३००, करडई ४ हजार ६५०, धने ५ हजार ५००, तर चिंचोक्याला १२०० रुपये क्विंटल असा सर्वसाधारण दर मिळाला. शनिवारी बाजार समितीत सोयाबीनची आवक झाली नसल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तुरीला ६३९० रुपयांचा दर...

बाजार समितीत शनिवारी १ हजार ६४४ क्विंटल तुरीची आवक झाली. त्याला ६ हजार ५०० कमाल, ६ हजार १६० किमान, तर ६ हजार ३९० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, सध्या शेतीची कामे सुरू असून, खरिपाची पेरणी चालू आहे. त्यामुळे शेतकरी कामात व्यस्त असल्याने बाजार समितीत शेतीमालाची आवक घटली असल्याचे चित्र आहे. पेरणी पूर्ण झाल्यानंतर शेतीमालाची आवक होईल, अशी शक्यता आहे.

Web Title: Income of 4,300 quintals of gram in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.