अनसरवाडा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:27+5:302021-05-08T04:20:27+5:30
येथील रुग्णांना औषधसुद्धा मिळत नाहीत. येथील उपकेंद्रात एकच परिचारिका असून, त्यांनाही ५ गावांमध्ये रुग्णांना तपासण्यासाठी जावे लागत आहे; तर ...

अनसरवाडा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
येथील रुग्णांना औषधसुद्धा मिळत नाहीत. येथील उपकेंद्रात एकच परिचारिका असून, त्यांनाही ५ गावांमध्ये रुग्णांना तपासण्यासाठी जावे लागत आहे; तर तेथील डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने त्या गृह विलगीकरणामध्ये आहेत, त्या मुळे उपचाराअभवी रुग्ण गंभीर होत आहेत. गावात आतापर्यंत ५ रुग्ण दगावल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. गावात कोरोना प्रतिबंधात्मक पहिली लस घेतलेले ३०० नागरिक आहेत. त्यांच्या दुसऱ्या लसीचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्याप त्यांना लस उपलब्ध झाली नाही. दुसरी लस आपणाला मिळेल की नाही, या भीतीपोटी नागरिक तणावात आहेत. या सर्व बाबींचा विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी, निलंगा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप विद्यार्थी तालुकाध्यक्ष नयन धनराज माने, सिद्धेश्वर पाटील, विष्णू भरगांडे, अनिकेत वाघमारे उपस्थित होते.