शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान, पीकविमा तात्काळ द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:17+5:302021-07-09T04:14:17+5:30
यासंदर्भात तहसीलदार संदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, शेषेराव गव्हाणे, धनराज पाटील, ...

शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान, पीकविमा तात्काळ द्यावा
यासंदर्भात तहसीलदार संदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, शेषेराव गव्हाणे, धनराज पाटील, सूर्यकांत पाटील, भानुदास पाटील, शिवराज मोरतळे, बालाजी पवार, अजित केंद्रे, शिवराम कपाळे, व्यंकट केंद्रे, लहुकुमार जाधव, हनुमंत नागलगावे, व्यंकटराव गव्हाणे, श्रीराम ढोबळे, नागोराव बळवंते, संगम टाले, मुजम्मिल मुंडकर, देविदास गोंड, सूर्यकांत पवार, बळीराम सोनटक्के, गंगाधर मुसळे, अशोकराव डांगे, सुधीर गव्हाणे, गंगाधर गिरी, शंकर शिवपुजे, ज्ञानेश्वर मालुसरे, धोंडिराम बडे, भानुदास पवार, बालाजी गुट्टे, मारुती आगलावे, बालाजी पवार, गणपत धुळशेट्टे, संतोष पवार, विनोद कांबळे, महारुद्र पाटील, लक्ष्मण एकलारे, मनोज तगडमपले, कृष्णा पाटील, अजय पटेल, गोविंद तिरते, अंकुश नकुरे आदी शेतकरी उपस्थित होते.
सध्या जळकोट तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मागील दोन वर्षांपासून नापिकीमुळे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. खरिपासाठी उसनवारी करुन बी-बियाणे, खते घेऊन पेरणी केली होती. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, २०१८-१९ व २०१९-२० मध्ये पिकविम्यास पात्र असतानाही तो मिळाला नाही. २०१९-२० मध्ये तूर पिकाचा विमा हा तुटपुंजा मिळाला.
तालुक्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असूनही सोयाबीनचा पीकविमा मिळाला नाही. २०१९-२० मध्ये तालुक्यात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले असतानाही नुकसानीकडे पीकविमा कंपनीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासनाने शेतकऱ्यांना त्वरित प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच पीकविमा तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.