हटकरवाडीत शिवमल्हार वाचनालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:21+5:302021-07-30T04:21:21+5:30
नळेगाव : चाकूर तालुक्यातील हटकरवाडी येथे शिवमल्हार वाचनालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. ...

हटकरवाडीत शिवमल्हार वाचनालयाचे उद्घाटन
नळेगाव : चाकूर तालुक्यातील हटकरवाडी येथे शिवमल्हार वाचनालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती माधवराव पाटील होते. यावेळी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, व्यंकट बेद्रे, डॉ. माणिकराव पाटील, बी. व्ही. मोतीपवळे, डॉ. सुरेश वाघमारे, वसंतअप्पा उबाळे, रामराव बुदरे, गुलाबराव पाटील, प्रा. धनंजय बेडदे, रविराज शिरुरे उपस्थित होते. या वाचनालयासाठी हटकरवाडीतील गुंडेराव हुडगे, शिवसांब हुडगे, शंकर हुडगे यांनी जागा दान दिली आहे. प्रास्ताविक ॲड. अण्णाराव पाटील यांनी तर सूत्रसंचालन गुंडेराव नागुरे यांनी केले. प्रा. वैजनाथ मलशेट्टे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विरेंद्र पांडे, घृष्णेश्वर मलशेट्टे, बंडू हुडगे, बबन हाके, बाबू हुडगे, बालाजी पाटील, राम मलशेट्टे, बापूराव मलशेट्टे यांनी पुढाकार घेतला.