रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:49+5:302021-07-24T04:13:49+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचा सत्कार लातूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूरच्यावतीने शुक्रवारी मुख्य ...

रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचा पदग्रहण सोहळा
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचा सत्कार
लातूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूरच्यावतीने शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचा सत्कार करण्यात आला. जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके यांच्या उपस्थितीत शिक्षक संघाची बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षकांचे व शिक्षणाचे अनेक प्रश्न चर्चिले गेले. त्यात निवड श्रेणी व चटोपाध्याय आदेशाबाबत सीईओंनी तातडीने आदेश पारित केले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने सीईओ गोयल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अप्पाराव शिंदे, सरचिटणीस विजयकुमार गुत्ते यांची उपस्थिती होती.
दयानंद कला महाविद्यालयात विद्यार्थिनींचा सत्कार
लातूर : दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रीदेवी झिंजरुटे हिने लॉकडाऊनच्या काळात डिझाईनर म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते श्रीदेवीचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, सुरेश जैन, संजय बोरा, प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, फॅशन विभागप्रमुख प्रा. सुवर्णा लवंद, प्रा. हर्षा जैन, प्रा. पी.के. देशमुख, प्रा. डी. एस. निलावार, प्रा. पी.व्ही. बिराजदार, प्रा. आर. जे. नाईक, प्रा. एस.टी. हालदार, प्रा. के.एस. बजाज, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
शहर जिल्हाध्यक्षपदी इस्माईल फुलारी यांची निवड
लातूर : महाराष्ट्र विकास आघाडीच्या संघटनात्मक बांधणी व ध्येय धोरणे लक्षात घेऊन इस्माईल फुलारी यांच्याकडे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील, महासचिव ॲड. अनिरुद्ध येचाळे, जिल्हा कार्याध्यक्ष कल्याण पाटील, विद्यार्थी आघाडीचे खुपसे पाटील, सुभाष लौटे, महिला आघाडीच्या डॉ. विद्या जामकर, सुनील कांबळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार
लातूर : तालुक्यातील कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयात एनएनएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कांदे, शिक्षक आर्य, उपमुख्याध्यापक देशमुख, कदम, मानकरी, धामणगावे, थंबा, मोकाशे, अक्कलदिवे, मस्के आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त केले.
ॲड. बिराजदार यांना पीएच.डी. प्रदान
लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील ॲड. विजयकुमार बिराजदार यांना राजस्थानातील जगदीशप्रसाद झॅबरमल टिब्रेवाला विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल राजू पटवारी, प्रशांत पाटील, महेश मठपती, गणेश सोनाळे, अशोक धुप्पे, नाना धुप्पे आदींनी कौतुक केले आहे.
पावसाची उघडीप मिळताच कामांना वेग
लातूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणीच्या कामाला लागले आहेत. जमिनीत ओलावा असल्याने कोळपणीचे काम बंद असले तरी ओलावा कमी होताच शेतीकामांना वेग येणार आहे. जिल्ह्यात सहा लाख प्रस्तावित क्षेत्र होते. त्यापैकी ४ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरम्यान, दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे.