शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

By हरी मोकाशे | Published: April 15, 2024 6:39 PM

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव

लातूर : चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सतत अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाचा पारा उतरला असला तरी पाणीटंचाईचे चटके वाढतच आहेत. सध्या जिल्ह्यातील ३४९ गावांच्या घशाला काेरड पडली आहे. ती कमी करण्यासाठी अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. टंचाईच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागत आहे. तोपर्यंत होरपळ सहन करावी लागत आहे.

गत पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, भूजल पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अं. से. पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडू लागले आहेत तर विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिकाही उचक्या देऊ लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांवर पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३८औसा - ४६निलंगा - ८६रेणापूर - ३४अहमदपूर - ८२चाकूर - २४शिरुर अनं. - ०७उदगीर - २०देवणी - ०१जळकोट - ११

अधिग्रहणाच्या पाण्यावर १६७ गावे...

जिल्ह्यातील २९८ गावे आणि ५१ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून अधिग्रहणाचे ४७६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २० गावांचे ४२ प्रस्ताव प्रत्यक्ष पाहणीनंतर वगळण्यात आले आहेत. उर्वरितपैकी २४९ गावांचे ३१२ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १३७ गावे आणि ३० वाड्यांचे अशा एकूण १६७ गावांचे १८३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ७ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तेथून १२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले नाही. सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात सुरु असून ४८ अशी संख्या आहे.

२४ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील २४ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात २१ गावे आणि तीन वाड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. सध्या ८ गावांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.त्यात लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे. आणखीन एक टँकर मंजूर आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा सुरु नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी