शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने; उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील, परिसर ‘अलर्ट झोन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:48 IST

शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात; कावळे मरण पावले त्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ जाहीर करण्यात आले आहे

उदगीर/लातूर : उदगिरातील ४२ कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाल्याने उदगीर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रविवारी दोन्ही ठिकाणे निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आली. या क्षेत्रात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच सर्वेक्षण करण्यात येत असून, कुक्कुटपक्ष्यांचे नमुनेही घेतले जात आहेत.

शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी परिसरात कावळे दगावल्याची घटना घडली. भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात बर्ड फ्लूमुळे कावळे मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिन्ही ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. तसेच या परिसराच्या १० किमीच्या परिघातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.

निर्जंतुकीकरण मोहीमकावळे दगावलेल्या तिन्ही ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच तेथील व्यावसायिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.- सुशांत शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा पालिका प्रशासक

सर्वेक्षण करणे सुरूरविवारी आणखीन दोन आजारी कावळे दगावले असून, मयत कावळ्यांची संख्या ५३ झाली आहे. या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच १० किमी परिघातील कुक्कुटपक्ष्यांचे नमुने घेतले जात आहेत.-डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूlaturलातूर