देशाच्या विकासात माहेश्वरी समाजाचे महत्त्वाचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:09+5:302021-06-21T04:15:09+5:30
तालुका माहेश्वरी सभा आणि मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित कोविड लसीकरण व महेश ...

देशाच्या विकासात माहेश्वरी समाजाचे महत्त्वाचे योगदान
तालुका माहेश्वरी सभा आणि मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित कोविड लसीकरण व महेश पूजन कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, गटविकास अधिकारी महेश सुळे, माहेश्वरी सभा जिल्हा सदस्य ईश्वरप्रसाद बाहेती, उदगीर सभा अध्यक्ष विनोदकुमार टवानी, सचिव श्रीनिवास सोनी, डॉ. रामप्रसाद लखोटिया, डॉ. रामेश्वर बाहेती, अमोल बाहेती, गोपाल मणियार, चंदन अटल, अतिश बियाणी, अमोल राठी, शिरीष नवांदर, कैलास मालू, डॉ. प्रवीण मुंदडा, सत्यनारायण सोमानी, गणेश बजाज, कोमल मालपाणी, युवा मंचचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमानी, सचिव गोविंदा सोनी, सुरेश तिवारी, पवन मुंदडा, संजयकुमार सोनी, आनंद बजाज, संजय नावंदर, रामबिलास नावंदर, द्वारकादास भुतड़ा, विष्णुदास लोया, राजकुमार नावंदर यांची उपस्थिती होती.
शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. शशिकांत देशपांडे, नोडल अधिकारी डॉ. सी.एस. रामशेट्टे, शुभांगी अंकुलगे, रामकिशन भोसले, सुलोचना जाधव, विनोदकुमार स्वामी यांनी पुढाकार घेतला.