"आयआयबी" ने केली २०२१ ची "फास्ट" घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST2021-02-09T04:22:25+5:302021-02-09T04:22:25+5:30
लातूर (प्रतिनिाधी) एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेसाठी देशपातळीवर नामांकित ''आयआयबी ने २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ''आयआयबी फास्ट'' मोफत प्रवेश ही ...

"आयआयबी" ने केली २०२१ ची "फास्ट" घोषणा
लातूर (प्रतिनिाधी) एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेसाठी देशपातळीवर नामांकित ''आयआयबी ने २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी ''आयआयबी फास्ट'' मोफत प्रवेश ही अभिनव योजना जाहीर केली आहे. तब्बल १००० विद्यार्थ्यांच्या शुल्का एवढी रक्कम माफ करण्याचा निर्णय सदर योजनेद्वारे आयआयबी ने घेतला आहे.
दरम्यान आयआयबी फास्ट हा उपक्रम नांदेड आणि लातूर शाखांमध्ये एकाच वेळी राबविणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी सांगितले. नीट-२०२० मध्येही टीम आयआयबी आणि विद्यार्थ्यांनी कोरोना काळातही मेहनत करत एमबीबीएसच्या १२५३ जागांवर शिक्कामोर्तब केले. हीच परंपरा कायम ठेवत
आर्थिक व सामाजिक दृष्टया दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी आयआयबी फास्ट ही मोफत प्रवेश चाचणी योजना आणली आहे. नीट-२०२२ ची तयारी करणार्या बारावीच्या विद्यार्थ्यांना ''आयआयबी फास्ट'' चा लाभ मिळेल. अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बारावी थिअरी तसेच नीट-२०२२ या परीक्षेची ''आयआयबी'' तज्ञांच्या टीमकडून तयारी करून घेतली जाईल.
आयआयबी फास्ट निवड चाचणी दोन टप्पयात होणार आहे. सविस्तर माहिती साठी आयआयबी च्या www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा आयआयबीच्या कार्यालयास संपर्क साधून नोंदणी करता येईल.
परीक्षेचे वेळापत्रक :
प्रथम प्रवेश चाचणी नांदेड व लातूर येथे २१ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. या निवड चाचणी मधून नांदेड साठी १००० विद्यार्थ्यांची व लातूर साठी ७०० विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाचणी साठी निवड होईल. अंतिम निवड चाचणी परीक्षा २५ फेब्रुवारी रोजी नांदेड व लातूर येथे घेण्यात येईल. नांदेड आणि लातूर येथे स्वतंत्ररीत्या या परीक्षा ठराविक वेळापत्रकानुसार तसेच नीट अभ्यासक्रमाच्या आधारावर होणार आहेत.