लाॅटरी लागल्याचे इ-मेल किंवा मेसेज आला असेल तर सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:14+5:302021-08-18T04:26:14+5:30
लाॅटरी लागली म्हणून एक लाख उकळले... केस - १ : आपल्याला पाच लाखांची लाॅटरी लागली आहे, असा मेसेज एका ...

लाॅटरी लागल्याचे इ-मेल किंवा मेसेज आला असेल तर सावधान !
लाॅटरी लागली म्हणून एक लाख उकळले...
केस - १ : आपल्याला पाच लाखांची लाॅटरी लागली आहे, असा मेसेज एका नागरिकाच्या माेबाईलवर आला. दरम्यान, त्यांनी याबाबत कुठलीही खातरजमा न करता या मेसेजला प्रतिसाद दिला. त्यांनी विचारलेली माहिती दिली आणि क्षणात बँक खात्यावरील ४० हजारांच्या रक्कम परस्पर गायब झाली.
केस - २ : आपल्याला ११ लाखांची लाॅटरी लागली आहे, याबाबतचा ई-मेल एका नागरिकाच्या माेबाइलवर आला. याबाबत कुठलीही सावधानता न बाळगता त्यांनी या इ-मेलाला प्रतिसाद देत त्यांनी विचारलेली माहिती दिली. यातून तब्बल ६० हजारांना एका भामट्याने गंडविल्याचे समाेर आले आहे.
फिशिंग इ-मेल...
एखाद्या बनावट कंपनीच्या नावाने फिशिंग ई-मेल्स किंवा मेसेज पाठविले जातात. या माध्यमातून संबंधित बॅक खातेदारांची माहिती, पासवर्ड, पिन चाेरी करुन फसवणूक केली जाते. याबाबत नागरिकांनी अशा फेक इ-मेलबाबत सावधानता बाळगण्याची गरज आहे. कुठलीही खातरजमा न करता आपली माहिती देवू नये, असेही पाेलीस अधिकारी यांनी सांगितले.
ही घ्या काळजी...
सार्वजिनक ठिकाणी सुरु असलेली वायफाय सेवा वापरु नये, फाेनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेटस् ठेवावी, सतत पासवर्ड बदलत राहणे गरजेचे आहे.
आपल्या माेबाइलवर आलेल्या अनाेळखी, फेक आणि बनावट इ-मेल आणि मेसेलला अजिबात थारा देता कामा नये.
आपण ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या माेबाइलमधील डाटा चाेरीला जाणार नाही, हॅक हाेणार नाही. याचीही काळजी घ्यावी.
वेबसाइटची सुरुवात ‘एचटीटीपीएस’पासून झाली आहे का...
आपल्या माेबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये एचटीटीपीएसपासून वेबसाइटची सुरुवात झाली आहे का, याची खातरजमा करुन घ्यावी.
वेबसाइटला क्लीक करण्यापूर्वी सावधानता बाळगण्याची गरज आहे. प्रारंभी याबाबत विचार करावा, मग क्लीक करावे.
जर एचटीटीपीएसपासून वेबसाइटची सुरुवात झाली असेल तरच क्ले करावे, ज्यातून आपली फसवणूक हाेणार नाही.