आदर्श शिक्षक उमेश खोसे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:20+5:302021-08-26T04:22:20+5:30
यावेळी स्टाफ सेक्रेटरी कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. श्रीकांत गायकवाड, अमोल पेठे, प्रा. काशिनाथ पवार, डॉ. संजय गवई, ...

आदर्श शिक्षक उमेश खोसे यांचा सत्कार
यावेळी स्टाफ सेक्रेटरी कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. श्रीकांत गायकवाड, अमोल पेठे, प्रा. काशिनाथ पवार, डॉ. संजय गवई, डॉ. रत्नाकर बेडगे व डॉ. विजयकुमार सोनी यांची उपस्थिती होती. यावेळी उमेश खोसे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे, यासाठी बंजारा तांड्यावर मुलांना मनोरंजक पद्धतीने अध्ययन करावे यासाठी ५१ प्रकारच्या ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोलीभाषेतून पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोली भाषा आणि तंत्रज्ञान या उपक्रमाची राज्यस्तरावरील शिक्षणवारी या उपक्रमात निवड झाली होती. यावेळी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे म्हणाले, मराठवाड्यातील एका उपक्रमशील शिक्षकाला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होणे आणि आमच्या महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार होणे ही एक आनंददायी बाब आहे. कार्यक्रमासाठी संजय गिरी, अशोक शिंदे व राम पाटील यांनी सहकार्य केले.