१८ वर्षापर्यंतच्या मुलींच्या शिक्षणाचा वैश्विकरणाचा विचार महत्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:35 IST2021-02-18T04:35:05+5:302021-02-18T04:35:05+5:30
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि क्राय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे तर प्रमुख ...

१८ वर्षापर्यंतच्या मुलींच्या शिक्षणाचा वैश्विकरणाचा विचार महत्वाचा
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि क्राय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. विक्रम काळे, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. सुरेश वाघमारे, विश्वनाथ तोडकर, मंदार शिंदे, बी.पी. सूर्यवंशी, डॉ. संजय गवई यांची उपस्थिती होती. कुमार निलेंदू म्हणाले, देशातील १८ राज्यांमध्ये ९० कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर बालकांचे घटनात्मक हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी क्रायच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. प्रास्ताविक बी.पी.सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले.आभार प्रा.रंजिता कोताळकर यांनी मानले. कार्यशाळेमध्ये विश्वनाथ तोडकर, डॉ. श्रीकांत गायकवाड, डॉ. अनिल जायभाये प्रा. मनीषा तोकले आदींची उपस्थिती होती.