शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

रेल्वे बोगीचा कारखाना मी आणला; टिकोजीरावांनी भूमिपूजन केले, सरकारला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:03 AM

महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे

लातूर : महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे, ही अटही आपण टाकली, मात्र ऐनवेळी श्रेय लाटणाऱ्या टिकोजीरावांनी भूमिपूजन उरकले, अशी खरमरीत टीका करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सरकारला घरचा अहेर दिला.मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा थेट नामोल्लेख टाळून उद्योगमंत्र्यांनी भूमिपूजन करणाºयांना टिकोजीराव म्हणत मित्र पक्ष भाजपवर परखड टीका केली. लातूर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले, बोगी निर्मितीचा कारखाना लातूरला व्हावा. तो परराज्यात जाऊ नये, यासाठी आपण त्यावेळी बोललो नाही. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीच मंत्रिपद सोडण्यापूर्वी महाराष्ट्रात होत असलेल्या लातूरच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. उद्योग विभागाच्या अधीन असलेली जागा आपण तत्पर उपलब्ध करून दिली. तसेच शिवसेनेच्या भूमिकेमुळेच स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार मिळेल. कोणी काहीही सांगत असले तरी भरती प्रक्रिया रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून होईल, असेही देसाई म्हणाले.यावेळी खा. चंद्रकांत खैरे म्हणाले, महाराष्ट्रात १५५ पेक्षा अधिक जागा मिळवून भगवा फडकावयाचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसांपर्यंत जावे. शेतकºयांच्या कर्जासाठी जे अधिकारी सहकार्य करणार नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ वठणीवर आणा, असेही ते म्हणाले.१५ लाख कसले; १५ चिंचोकेही नाही..!प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत एका अहवालानुसार २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ म्हणाले. तिथे आज कवडीमोल भाव मिळत आहे. भाजप नेत्यांना सत्ता म्हणजे जादूची कांडी वाटली आणि ते आश्वासन देत सुटले. खात्यावर १५ लाख टाकायला निघाले होते, आता १५ चिंचोकेही नाहीत. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई