शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भूक लागली, जेवण वाढ; 'हाताने घेऊन खा' म्हणताच कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 22:54 IST

आराेपी रेणापूर पाेलिस ठाण्यात हजर; म्हणाला, साहेब बायकाेचा खून करून आलाेय...

रेणापूर (जि. लातूर) : कुऱ्हाडीचे धाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना घनसरगाव (ता. रेणापूर) शिवारात शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पत्नीचा खून केल्यानंतर आराेपी पती हा रेणापूर पाेलिस ठाण्यात स्वत: हजर हाेत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेने घनसरगावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पाेलिसांनी सांगितले, घनसरगाव येथील चंद्रकांत बाबुराव मदने (वय ५५, रा. घनसरगाव) हे पत्नीसह घनसरगाव शिवारातच असलेल्या शेतात कामासाठी गेले होते. दरम्यान, त्या ठिकाणी दुपारच्या सुमारास पती चंद्रकांत मदने यांनी पत्नी मीराबाई चंद्रकांत मदने (वय ४५) हिला भूक लागली आहे, जेवण वाढ म्हटले. त्यावेळी बायकोने तुम्हीच हाताने घ्या, असे म्हटल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. संतप्त पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. जवळच असलेल्या कुऱ्हाडीने चंद्रकांत मदने यांनी पत्नी मीराबाईच्या डोक्यात घाव घातले. यात गंभीर जखमी झालेली पत्नी जमिनीवर काेसळली. त्यानंतर पुन्हा चंद्रकांत याने रागात कुऱ्हाडीचे घाव घातले. यामध्येच मीराबाई मदनेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर आराेपी पती चंद्रकांत मदने याने रेणापूर पाेलिस ठाणे गाठले आणि मी बायकोला ठार मारून आलाे आहे, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत घटनेची माहिती गावचे पाेलिस पाटील आणि मुलाला फोनवरून सांगितली. पाेलिस पाटील आणि मुलाने ही घटना खरी असल्याचे पाेलिसांना सांगितले.

घटनास्थळी चाकूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र चौधर, रेणापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, पाेलिस उपनिरीक्षक डोईफोडे, घनसरगावचे बीट अंमलदार बालाजी डप्पडवाड यांनी भेट देत पंचनामा केला. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास रेणापूर पाेलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife killed with axe after 'eat with your hands' argument.

Web Summary : In Renapur, a husband murdered his wife with an axe after an argument about serving food. The husband surrendered to police, confessing to the crime. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार