विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांना अटक

By Admin | Updated: March 2, 2017 18:18 IST2017-03-02T18:18:51+5:302017-03-02T18:18:51+5:30

निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथील विवाहिता वर्षाराणी शिवशंकर तिप्पनबोणे (२२) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कासारशिरसी पोलीस

The husband and his father-in-law were arrested for their marriage | विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांना अटक

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांना अटक

>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 02 - निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथील विवाहिता वर्षाराणी शिवशंकर तिप्पनबोणे (२२) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात वडिलांच्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
निलंगा तालुक्यातील हालसी हत्तरगा येथील लक्ष्मण तात्याराव फलसुरे यांची मुलगी वर्षाराणी तिप्पनबोणे हिचा विवाह २८ फेब्रुवारी २०१६ रोजी रितीरिवाजाप्रमाणे नदी हत्तरगा येथील शिवशंकर यांच्याशी झाला होता. दोन महिने चांगले नांदविले, त्यानंतर शिवशंकर तिप्पणबोने याला नोकरी लावण्यासाठी वर्षाराणीच्या सासरच्या मंडळींनी पैशासाठी मानसिक व शाररीक छळ सुरु केला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसदिनी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास वर्षाराणी हिचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी वडिल लक्ष्मण  तात्याराव फुलसुरे (रा. हालसी हत्तरगा) यांच्या तक्रारीवरुन कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास पती शिवशंकर भरत तिप्पनबोणे, सासरा भरत गुंडप्पा तिप्पणबोने, सासू चंपाबाई भरत तिप्पणबोणे आणि नणंद आशा भरत तिप्पणबोणे या चौघांविरोधात गुरनं २९ / २०१७ कलम ३०४ (ब), ४९८ (अ), ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांनाही पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली आहे.

Web Title: The husband and his father-in-law were arrested for their marriage